मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यासोबतच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही नकारात्मक ट्विट केलं आहे. राज्यातील सर्व स्थिती पाहता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी टोला हाणला आहे.
पंतप्रधान देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले, असं छगन भुजबळ म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्याला आले होते. याचाच धागा पकडत भुजबळ यांनी निशाणा साधला आहे.
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही महत्वाची भूमिका घेतील असं वाटत नाही, असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.