“तर माझे अडीच वर्ष जेलमध्ये गेलेचं नसते, माझा ‘हा’ धाकटा भाऊ…;” छगन भुजबळ भावूक झाले

नाशिक : (Chhagan Bhujbal On Gopinath Munde) स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब (Gopinath Munde) असते तर माझे अडीच वर्ष जेलमध्ये गेलेचं नसते, पहाडासारखा हा माझा धाकटा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असता. महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी हा नेता आजही आपल्यात पाहिजे होता. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचं काम सुरू ठेवू, असे आवाहन करताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) भावूक झाले.

सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड या स्मारकाचे व त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, लोकांसाठी काम केलेल्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी हजारो लोक स्वयंस्फूर्तीने येत असतात. बहुजनांना एकत्र आणण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले असून, ओबीसींची गणना झाली पाहिजे, मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले.

सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेणे, हीच स्व. गोपीनाथ मुंडे यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी सांगितलं. गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसीसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी सुरू केलेल्या कामाची सर्व जबाबदारी आता माझ्यावर आणि तुमच्यावर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचं काम सुरू ठेवू असे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले.

यावेळी बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांचं अकाली जाणं हे आपल्यासाठी मोठा धक्का आहे. ज्यावेळी माझे धाकटे भाऊ गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर मला अतिशय तीव्र असे दुःख झाले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Prakash Harale: