मुंबई – Maharashtra Politics : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन पंचवीस दिवस झाले अजून एकही मंत्रिमंडळ स्थापन केले गेले नाही. राज्यात मुसळधार पाऊसामुळे पूरस्थिती आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, मंत्रिमंडळच अस्तित्वात नाही तर तक्रार करणार कोणाकडे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर बोलताना सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन पंचवीस दिवस पूर्ण झाली आहेत. मात्र एकही मंत्रिमंडळ अजून तयार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सतत दिल्ली दौरा करत आहेत. राज्यात अतिवृष्टीचे संकट आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राज्यात मंत्रिमंडळ तयार असतं तर याची दखल घेतली गेली असती आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली असती. अशी अशा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.
सध्या सगळ्या खात्यांची जबाबदारी सरकारी अधिकाऱ्यांवर आहे. लोकप्रतिनिधी असते तर शेतकऱ्यांना मदत मिळाली असती. मात्र, मंत्रिमंडळच अस्तित्वात नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अशी टीका खडसे यांनी सरकारवर केली आहे.