मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज जालना दौऱ्यावर; मनोज जरांगे उपोषण सोडणार?

मुंबई | Manoj Jarange Patil – आज (13 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे जालना (Jalna) दौऱ्यावर आहेत. जालन्यात जाऊन ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज संध्याकाळी आंतरवाली गावात पोहोचतील. त्यानंतर ते मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करतील. त्यामुळे जरांगे त्यांचं उपोषण सोडणार का? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यात येऊन उपोषण सोडवावं, अशी अट मनोज जरांगेंनी ठेवली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अट मान्य केली आहे. त्यामुळे आज एकनाथ शिंदे आणि अजित पवार जालन्यात जाणार आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार नाहीयेत. कारण आज दिल्लीमध्ये आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस समितीचे सदस्य म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Sumitra nalawade: