मुंबई : गुरुवार दि. ३० रोजी एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत दाखल झाले. मुंबईत आल्यानंतर शिंदे यांनी प्रथम भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. अर्ध्या तासांच्या चर्चेनंतर फडणवीस आणि शिंदे यांनी साडेतीन वाजता राज्यपालांना भेटल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला.
दरम्यान, भाजपचे एक शिष्टमंडळ आणि शिंदे गटातील एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर सायंकाळी एकटे एकनाथ शिंदे हे शपथ घेणार असं देवेद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर सांगितले. शपथविधी सोहळा राजभवनात होणार असून शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
मात्र, यानंतर असा प्रश्न निर्माण झाला की, शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असतील तर एवढा आटापिटा करणाऱ्या आणि मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांचे काय?. त्यांच्याकडे या मंत्रीमंडळातील कोणते पद असणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.