मुंबई Eknath Shinde On Delhi Visit : महाराष्ट्रातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही मंत्र्यांसोबत दिल्ली दौऱ्यावर होते. गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तब्बल ४० मिनिट त्यांच्यात चर्चा झाली. एकनाथ शिंदे हे २१ तारखेलाच परतणार होते मात्र, अमित शहा यांच्याशी भेट न झाल्यामुंळं त्यांच्या दौरा लांबल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या शिवसेना वाद आणि वेदांता प्रकल्पामुळे एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.
दादर मधील शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून राज्यात तणावाचं वातावरण आहे. त्यातच बीएमसीने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे दोनीही गटांनी कोर्टात धाव घेतली आहे.