वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची बैठक; सतर्क राहण्याचा पंतप्रधानांचा इशारा

नवी दिल्ली : देशाच्या विविध भागातल्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांतील वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यामंत्र्यांसोबत बुधवारी आढावा बैठक घेतली. सर्व पात्र मुलांचे लसीकरण लवकर होण्यासाठी प्रयत्न करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. त्यासाठी शाळांमध्ये विशेष कार्यक्रम राबवण्यात यावेत असं मत मोदींनी बैठकीत व्यक्त केलं आहे.

ते म्हणाले की, आत्तापर्यंत देशातील ९६ टक्के प्रौढ लोकसंख्येला किमान एक डोस देण्यात आला आहे ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. 15 वर्षांवरील वयाच्या पात्र लोकसंख्येपैकी 85% लोकांना कोविड-19 लसीचा दुसरा डोस देखील देण्यात आला आहे. अशी माहिती मोदींनी दिली आहे.

त्याचबरोबर केंद्र आणि राज्यांच्या संयुक्त प्रयत्नानंतर देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये बरीच वाढ झाली असल्याचं असल्याचं सांगत त्यांनी वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ वाढवण्यासह आवाहन केले आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या वाढत्या संख्येत लक्षात घेत सतर्क राहावं लागणार असल्याचं इशाराही त्यांनी यावेळी आहे.

Dnyaneshwar: