मुंबई – Anil Parab : माजी परिवहन मंत्री शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्टची जमीन खरेदी आणि बांधकाम याप्रकरणी चौकशीचा ससेमीरा त्यांच्यामागे सुरूच आहे. ते रिसॉर्ट बांधण्यासाठी अनिल परबांकडे पैसा आला कोठून यावरून रिसॉर्टचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचं विरोधकांकडून म्हटलं जात आहे. दरम्यान, आता नवीनच दावा समोर आला आहे. अनिल परबांचे दापोडीतील रिसॉर्ट पुढील आठवड्यात पाडण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परबांचे दापोलीतील रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. काल रात्रीच मुख्यमंत्र्यांनी अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केली आहे. सध्या ती फाईल पर्यावरण मंत्रालयाकडे आहे. ते रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देणार आहेत. काहीच दिवसांत अनिल पराबांचे रिसॉर्ट इतिहासजमा होईल” असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी असा दावा केला आहे.