कलाटेंचं बंड अखेर होणार थंड? म्हणाले, उद्धव ठाकरेंचा अनादर करायचा नाही, पण…

चिंचवड : (Chinchawad ByElection Suspense Continued Rahul Kalate) चिंचवड पोटनिवडणुक खूप चर्चेत आली आहे. त्यामुळे पुढे देखील ही निवडणूक खूप चूरशीची आणि रंगीत होणार आहे. त्याचे कारण चिंचवडची जागा ही महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली असून शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी येथे उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे हि बंडखोरी महाविकास आघाडीची डोकेदुखी ठरली असून, याचा फायदा थेट भाजप उमेदवाराला होणार आहे.

दरम्यान, राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख यांच्या संदेश घेऊन आलेले शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी कलाटेंची भेट घेतली. यानंतर स्वतः राहुल कलाटे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राहुल कलाटे म्हणाले, “चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अर्ज मागे घ्यावा यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर मला भेटले. त्यानुसार मला उद्धव ठाकरेंचा अनादर करायचा नाही, पण माझ्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर अर्ज मागे घ्यायचा की नाही यावर मी यावर निर्णय जाहीर करेन”

दरम्यान, आज शिवसेनेचे आमदार सचिन आहिर यांनी राहुल कलाटे यांची भेट घेतली. यावेळी आहिर यांनी उद्धव ठाकरेंचा निरोप राहुल कलाटे यांना दिला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राहुल कलाटे यांच्यात फोनवरून चर्चाही झाली. आज तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे.

Prakash Harale: