मविआची डोकेदुखी वाढली! चिंचवडमध्ये राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा जाहीर, कसब्यात तटस्थ

चिंचवड : (Chinchwad By Election VBA support to Rahul Kalate) पुण्यातील निधानसभेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागेसाठी रंगत आली आसतानाच, आता वंचित बहुजन आघाडीनं नवीन ट्विष्ट आणला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एक-एका मतांसाठी गोळा बेरीज करत असतानाच चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी आणखी वाढली आहे. कारण वंचित बहुजन आघाडीनं अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी कलाटेंच्या पाठिंब्याचं अधिकृत पत्र जाहीर केलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं की, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकी संदर्भात चर्चा झाली.

चिंचवडमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचितनं पाठिंबा दिला होता.‌ त्यामुळं त्यांना 1 लाख 12 हजार मते मिळाली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृहाचे नेते आहेत, म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता, परंतु तसे घडले नाही.

भाजपला चिंचवडमध्ये राहुल कलाटेच थांबवू शकतात त्यामुळं वंचितच्या राज्य कार्यकारिणीनं एकमतानं राहुल कलाटे यांना पाठींबा जाहीर केला असून त्यांनाच निवडून आणण्याचं आवाहन चिंचवडमधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे, असं रेखा ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Prakash Harale: