चित्रा वाघ यांचा आ. भुजबळांना सवाल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदामातेचे फोटो का लावले जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ब्राह्मण महासंघानेही भुजबळांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करीत भुजबळांना लक्ष केले. नथुराम गोडसेचे पुतळे उभे करू, असे भुजबळांनी म्हटले होते, याची आठवण त्यांनी करून दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये वाघ म्हणतात, एकेकाळी नथुरामचे पुतळे उभारू, असे म्हणणारे भुजबळसाहेब हेचं. क्रांतिज्योती सावित्रीमाईंची पूजा करायला हवी, पण सरस्वतीला विरोध कशासाठी? ते ज्या साडेतीन टक्क्यांबद्दल बोलत आहेत, त्यातल्याच एकाच्या भिडे वाड्यात सावित्रीमाईंची शाळा भरली होती, हे सोयीस्कर विसरायचं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, सोमवारी छगन भुजबळ यांनी महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित महोत्सवात उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत, त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. देशात अंधश्रद्धावाढीला लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला आहे.

Sumitra nalawade: