‘…पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रा वाघ यांनी मला भाग पाडले’; रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेचा खळबळजनक आरोप

मुंबई : रघुनाथ कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने आज एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीच आपल्याला फुस लावल्याचं तिने म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमयरित्या वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्ह्याची नोंद आहे. आता चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून आपण रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दिली असल्याचं तिनं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पीडितेने चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरूनच आपण हे सगळं केलं असल्याचं म्हटलं आहे. शिवाय मला सुसाईड नोट लिहिण्यास देखील चित्रा वाघ यांनी भाग पाडले असल्याचा गंभीर आरोप देखील पीडित मुलीने केला आहे. शिवाय, खोटे मेसेजही वाचून दाखवले असून हे मेसेज मी पाठवले नाहीत किंवा कुचिकनेही पाठवले नाहीत, त्यामुळे मी या सर्वांबाबत पोलिसांना सांगणार असल्याचंही पीडिता म्हणत आहे.

गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने मला डांबून ठेवले गेले. पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रा वाघ यांनी मला भाग पाडले. काल भाजपाच्या एका व्यक्तीने एक पत्र आणून दिले. जे पोलिसांना देण्याची जबरदस्ती माझ्यावर केली जात आहे. हे सर्व आरोप पीडित तरुणीने चित्रा वाघ यांच्या विरोधात केले आहेत.

Sumitra nalawade: