मुंबई – Chitra Wagh on Shivsena | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे जवळपास 40 आमदार आहेत. अशातच यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे भावनिक आवाहन केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळातील गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचाही समावेश आहे. याचाच धागा पकडत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
राज्याचा गृहराज्यमंत्री दुसऱ्या राज्यात पळून गेला तरी महाविकास आघाडी सरकारला त्याचा थांगपत्ता ही लागला नाही. हे असे सरकार आणि हे असे मुख्यमंत्री, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. याबाबत चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, हिंदुत्व आणि शिवसेना वेगळं होऊ शकत नाही. गेल्या अडीच वर्षात किती वेळा याचं सारखं सारखं स्पष्टीकरण द्यावं लागतं यातच तुमचा फोलपणा कळतो, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.