“A for अमेठी, B for…”, चित्रा वाघ यांचं सुप्रिया सुळेंना खोचक प्रत्युत्तर

chitra wagh supriya sulechitra wagh supriya sule

मुंबई | Chitra Wagh On Supriya Sule – भाजप प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप (BJP) आता पक्ष राहिला नसून लाॅन्ड्री झाली आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्या या टीकेला चित्रा वाघ यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भाजपची काळजी सोडा सुप्रियाताई…2024 साठी आपल्या लोकसभा मतदारसंघाची काळजी घ्या…A for Amethi, B for Baramati…”, असं खोचक प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना दिलं आहे.

काल (16 ऑक्टोबर) पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी महागाई आणि बेरोजगारीवरून भाजपवर जोरदार टीका केली. तसंच त्यांनी इतर पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात घेण्यावरून टोला लगावला होता. “आधी भाजप पक्ष होता. पण आता भाजप पक्ष राहिला नसून लॉन्ड्री झाली आहे. भाजपामध्ये जिकडे तिकडे इतर पक्षातून आलेले नेते दिसतात. ज्यांनी भाजपला वाढवलं ते खरे कार्यकर्ते आज कुठे आहेत?” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

Sumitra nalawade:
whatsapp
line