“टक्केवारी पोहोचली की…”; चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर केला ‘हा’ गंभीर आरोप!

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत असतात. सरकारला कोणत्या ना कोणत्या. मुद्द्यावरून निशाण्यावर पकडत असतात. अशातच मुंबईमध्ये (Mumbai)| गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील बेस्टच्या (Best) परिवहन आस्थापनामध्ये कंत्राटी कामगारांचं आंदोलन सुरू आहे.

बेस्टच्या कंत्राटी कामगारांना वेळेत वेतन मिळत नसल्यामुळे ते आंदोलन करत आहेत, मात्र बेस्ट मुख्यमंत्र्यांचे (CM Uddhav Thackeray) सरकार कंत्राटदारांविरुद्ध काहीही कारवाई करत नाहीत. टक्केवारी पोहोचली की तुम्हाला वेतन मिळो की न मिळो, तुमचा पगार तुमची जबाबदारी, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांनी याचाच धागा पकडत राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. याबाबत चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे. यावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळू शकतो.

Nilam: