‘आपला परिवार’ने राबविली स्वच्छता मोहीम

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आणि “आपला परिवार सोशल फाउंडेशन” पुणे यांच्या सहकार्याने पिंपरी येथील एचए मैदान येथे “प्लॉगेथॉन” मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सुमारे ८.५ टन कचरा संकलित करण्यात आला.

यावेळी क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त अण्णा बोदडे, सहायक आरोग्याधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजीनवाल, आरोग्य निरीक्षक शैलेश वाघमारे, लक्ष्मण साळवे, आपला परिवार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुदाम शिंदे, उपाध्यक्ष अनिल शर्मा, सचिव अजित भालेराव, कार्याध्यक्ष किरण कांबळे, सहसचिव दत्तात्रय बोराडे, उद्धव वांजळे यांच्यासह २५० स्वयंसेवक, महापालिकेचे ७० कर्मचारी, बीव्हीजी ग्रुपचे कर्मचारी, डिव्हाईन संस्थेचे कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी आदी सहभागी
झाले होते.

Dnyaneshwar: