मुंबई : (CM Eknath Shinde Delhi Tours Cancel) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी पूर्वनियोजित दिल्ली दौरा बुधवारी दि. 28 रोजी आचानक रद्द केला. त्यामुळं शिंदे-भाजप युती सरकारच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असं मुख्यमंत्री शिंदे सांगत असले तरी, केंद्रातील भाजपच्या नेतृत्वानं हिरवा कंदिल दिल्याशिवाय अंतिम निर्णय होण्याची शक्यता नाही.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटातील किती आणि कोणत्या सदस्यांची मंत्रीपदावर वर्णी लागणार याचा निर्णय एकनाथ शिंदे हेच घेणार असले तरी, भाजपचे केंद्रीय नेतृत्व शिंदे गटाची संभाव्य यादी नजरेखालून घालणार आहे. त्यानंतर खातेवाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाने मंत्र्यांची यादी तयार केली तर, शिंदेच्या दिल्ली दौऱ्यात त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकेल.
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ईतर राज्याच्या दौऱ्यावर असल्यानं व १ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील आमदारांची अपात्रता, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याचा शिवसेनेचा अर्ज, लोकसभेतील गटनेता बदलण्याला लोकसभाध्यक्षांनी दिलेल्या मंजुरीविरोधातील अर्ज अशा विविध मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामुळं भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ही भेट लांबणीवर टाकली असल्याच सांगितलं जात आहे.