“२०१९ मध्ये सोनिया गांधीचा फोटो लावून निवडणूक लढवली होती का? नरेंद्र मोदी आणि…”; एकनाथ शिंदेंचा सवाल

जळगाव CM Eknath Shinde In Jalgao: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव मध्ये पाळधी शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी आम्ही बंड करून चूक केली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. “२०१९ मध्ये शिवसेना भाजपसोबत युती म्हणून आपण निवडणूक लढलो होतो. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या विरोधात लढलो होतो. आणि शेवटी साहेबांनी विरोधाकांसोबत हातमिळवणी केली. आज आम्ही तेच केलं आहे जे २०१९ मध्ये ठरलं होतं.” असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीवर दिलं आहे.

२०१९ मध्ये आपण सोनिया गांधीचा फोटो लाऊन निवडणूक लढवली होती का?

“२०१९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात निवडणूक लढून साहेबांनी त्यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. त्यानंतर आम्ही सर्वांनी साहेबांना खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला. आपण २०१९ मध्ये केलेली चूक दुरुस्त करून आगोदर जे ठरलं होतं तसचं करू. मात्र, झोपलेल्या माणसाला जागं करता येतंय. झोपेच सोंग आणणाऱ्या माणसाला नाही. साहेबांनी लक्ष दिलं नाही. २0१९ मध्ये आपण सोनिया गांधीचा फोटो लाऊन निवडणूक लढलो नव्हतो. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लाऊनचं निवडणूक लढलो होतो. आम्ही तेच केलं आहे. मग गद्दार कोण?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना केला आहे.

Dnyaneshwar: