नवी दिल्ली : (CM Eknath Shinde On Delhi Press Conference) मंगळवार दि. 19 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या तब्बल 12 खासदारांची दिल्लीत बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले, लोकसभेत शिवसेनेचा गट स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्या पार्श्वभुमीवर आज लोकसभा अध्यक्षांना १२ खासदारांचं पत्र दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाबाबत उद्या सुनावणी सुरु असल्यानं त्याबाबतची चर्चा झाल्याचं यावेळी शिंदे यांनी सांगितलं. महाराष्ट्र सदन इथं पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रथम मी शिवसेनेच्या १२ खासदारांचं स्वागत करतो. त्यांनी घेतलेली भूमिका ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे. ही भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचं सरकार स्थापन केलं आहे.
अडीच वर्षांपूर्वी जे शिवसेना-भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात येणं अपेक्षित होतं आता अनेक घडामोडीनंतर आम्ही स्थापन केलं आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही अनेक निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचा भाव कमी केले, शेतकऱ्यांचं कर्ज, कमी करण्याबरोबत शेतजमिनी ओलिताखाली आणण्याचे निर्णय घेतले. त्यामुळं आम्ही घेतलेल्या भूमिकेचं समर्थन शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्ये, पदाधिकारी, त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेनं त्याचं समर्थन केलं आहे. आमच्या या निर्णयांना केंद्र सरकारने पूर्ण पाठिंबा दिला, असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.