मुंबई : (CM Eknath Shinde On Shivsena) दोन दिवशीय विशेष अधिवेशन गाजलं ते सत्ताधारी आणि विरोधकांच्या भाषणानं एकाचढ एका आमदारांनी सभागृह दणाणून सोडलं त्यामुळं हे आधिवेशन विशेष गाजलं. या सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही धडाकेबाज भाषण केलं. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी काँग्रस, राष्ट्रवादीसोबत सत्तेत असताना होत असलेल्या घुसमटीबद्दल भाष्य केलं. माझं खच्चीकरण करण्याचा देखील प्रयत्न केला जात होता, असं शिंदे म्हणाले. त्यांंच्या या भाषणाची नंतर काही दिवस राज्यभर चर्चा झाली.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे पंढरपूर येथिल मेळाव्यात बोलत होते. मी पहिल्या दिवसापासून हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. ती सामान्य जनतेनं आणि शिवसैनिकांनी मान्य केली. सर्वांगीन विकासाचं हे हिंदुत्व असेल असा विश्वास ठेवा. माझ्यातला कार्यकर्ता मी कधी मरु देणार नाही. मी मुख्यमंत्री असलो तरी, जनतेचा सेवक म्हणूनच मी काम करेन. तुम्हाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा मंत्रालयातील मुख्यमंत्री दालन खुले असेल, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी दिला.
जो अनुभव मागील अडीच वर्षात आला त्याची चर्चा जाहीरपणे करु शकत नाही. सभागृहातील भाषणात मी थोडेच सांगितले आहे. अजून खूप काही सांगायचे बाकी आहे. वेळ आणली तर नक्कीच त्याचा उहापोह करेन. मी कोणावरही टीका करत नाही. खालच्या पातळीवर जाऊन कधी बोलत नाही. मी कमी बोलतो, जास्त ऐकतो. काम जास्त करतो असं शिंदे म्हणाले.