अजित पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर! म्हणाले आम्ही…

मुंबई : (CM Eknath Sinde On ajit Pawar) गुरुवार दि. १४ रोजी शिंदे आणि फडणवीस सरकारने राज्यात पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केला. त्यामुळं पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी कमी झालं. यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर खोचक टीका केली. भाजप विरोधीपक्षात होते तेव्हा त्यांनी इंधनावरील टॅक्स ५० टक्क्यावर करण्याची मागणी केली होती. त्यांनी टॅक्स ५० टक्क्यावर का नाही आणला? टॅक्स ५० टक्क्यावर आणला असता तर, डिझेल ११ आणि पेट्रोल १७ रूपयांनी कमी झालं असतं.

दरम्यान, पुढं बोलताना पवार म्हणाले की, राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळं सध्या राज्यात शिंदे आणि फडणवीस हे दोघे जणच महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. सगळा भार या दोघांच्या खांद्यावर आहे अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले की, आम्ही अजित पवारांसारखे आम्ही मालक नसून जनतेचे सेवक आहोत. त्यामुळचं आम्ही स्वतः गडचिरोलीला जाऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी शिंदे यांनी राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे सूचक विधान केलं आहे. शपथविधीबाबत इतर पक्षाकडून दिशाभूल करणारी वक्तव्य केली जात आहेत. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Prakash Harale: