ज्याची भीती होती तेच घडले; संतप्त मुख्यमंत्र्यांचे राजीनाम्याच्या दिशेने पहिले पाऊल

मुंबई- Maharashtra Election : महाराष्ट्रातील दोन दिवसाच्या भूकंपानंतर संतप्त शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षातील कोणालाही मी मुख्यमंत्री पदासाठी नालायक वाटत असेल तर त्यांनी मला सांगा मी लगेच राजीनामा देतो. आणि मुख्यमंत्र्यासाठी असलेला वर्षा बंगला देखील सोडतो. मला मुख्यमंत्री पदाचा आणि सत्तेचा मोह नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितलं आहे.

थोड्याच वेळापूर्वी बोललेल्या गोष्टींपैकी उद्धव ठाकरे यांनी एक निर्णय तातडीने घेतला आहे. ठाकरे यांनी वर्षा बंगला नुकताच सोडला आहे. ते आपल्या मातोश्री बंगल्याकडे रवाना होत आहेत. त्यांनी तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे शिवसैनिक भावनिक झाले आहेत. वर्षा बाहेर शिवसैनिकांनी शक्तीप्रदर्शन केलं आहे.

संतप्त उद्धव ठाकरे मुख्यमत्री पदाच्या राजीनाम्याचा निर्णय घेतील की काय अशी भीती शिवसैनिकांमध्ये वाढलेली दिसत आहेत. वर्षा सोडण्यापूर्वी ते महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्यांना भेटले आहेत. आणि एकावर एक शिवसेनेतील आमदार नॉट रिचेबल होताना दिसत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री खचून जाताना दिसत आहेत. मात्र संजय राऊत लढाई अजून बाकी असल्याचं म्हणत आहेत.

Dnyaneshwar: