मुंबई | Mansoon Finally Arrives In Kokan – सर्वांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अखेर कोकणात नैऋत्य मान्सून दाखल झाला आहे. यासंदर्भात भारतीय हवामान विभागानं माहिती दिली आहे. सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले होते. अखेर मान्सूनची प्रतिक्षा संपली असून नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसंच भारतीय विभागानं सांगितलेल्या अंदाजानुसार मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून पुढच्या २४ तासांत कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. तसंच कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी पुढे सरकली आणि आज अखेर मान्सून कोकणात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, तसंच संपूर्ण गोवा, कोकणचा काही भाग आणि कर्नाटकच्या काही भागात दाखल झाला आहे.
दरम्यान, राज्यात मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण शेतकरी खरीपाच्या पेरणीसाठी मान्सूनची वाट बघत होते. अखेर मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी हवामान विभागानं पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. कारण कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी अखेर रुळावर आली असून मान्सून आज कोकणात दाखल झाला आहे.