विजेच्या धक्क्याने एकाच घरातील तिघांचा मृत्यू: महावितरणकडून प्रत्येकी ४ लाखांची मदत

Blue Guest Featured Live Event Twitter Post 2024 06 18T170032.396Blue Guest Featured Live Event Twitter Post 2024 06 18T170032.396

दापोडीत वीजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना महावितरणकडून मदत

दापोडी (ता. दौंड, जि. पुणे) येथे सोमवारी (दि. १७ जून) सकाळी ७ वाजेच्या सुमारास विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर मयतांच्या वारसांना महावितरणमार्फत प्रत्येकी ४ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मूळ सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेले भालेकर कुटुंब दापोडी (ता. दौंड) येथील सूर्यकांत महादेव अडसूळ यांच्या घरी भाड्याने राहत होते. अडसूळ यांच्या घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत अंदाजे सहा फूट उंचीचे वीट बांधकाम व त्यावर साडेतीन फूट उंचीचे लोखंडी पत्र्याचे कंपाऊंड केलेले आहे. शेजारी असलेल्या चव्हाण यांचे घराला ज्या सर्व्हिस वायरने वीजपुरवठा होतो. ती सर्व्हिस वायर अडसूळ यांच्या घरावरुन अधांतरी गेली आहे. त्याच खांबावरील एका पडेर नामक ग्राहकाची सर्व्हिस वायर खराब झाली असल्याचे निदर्षणास आले होते. या सर्व्हिस वायरमधून सर्वच GI वायरमध्ये वीजप्रवाह उतरला होता. त्यापैकी चव्हाण यांची GI वायर अडसूळ यांच्या पत्र्याच्या कंपाऊंडच्या संपर्कात आल्याने वीजप्रवाह अडसूळ यांच्या कंपाऊंडच्या अँगलला उतरला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान सोमवारी सकाळी सूर्यकांत अडसूळ यांचेकडे भाड्याने राहणारे सुरेंद्र देविदास भालेकर (वय ४५) अंघोळीसाठी गेले असता पत्र्याच्या अँगलला बांधलेल्या तारेवर टॉवेल टाकत असताना त्यांना विद्युतभारीत झालेल्या तारेचा त्यांना शॉक लागला. त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या मुलगा प्रसाद (वय १७) आणि पत्नी आदिका (वय ४०) यांनाही शॉक लागला व या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.

महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराचा वीजप्रवाह बंद करुन विद्युत निरीक्षक कार्यालयास पंचनाम्यासाठी बोलावले. पंचनामा व शवविच्छेदन अहवाल लवकरच प्राप्त् होईल. तत्पूर्वी महावितरणकडून वीज अपघातामधील मयतांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत दिली जाणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.

Rashtra Sanchar Digital:
whatsapp
line