राजीव गांधींच्या मारेकऱ्याच्या सुटका; काँग्रेसचा भाजपवर आरोप

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयाकडून सुटका मिळाली आहे. याघटनेनंतर काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आरोपीच्या सुटकेनंतर सुरजेवालांनी मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे. याचबरोबर सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली की,न्यायालयाला असा सुटकेचा आदेश द्यावा लागला असा त्यांनी आरोप केला आहे.

तसंच सप्टेंबर 2018 रोजी तामिळनाडूच्या तत्कालीन भाजप सरकारने तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना राजीव गांधींच्या हत्येतील सातही दोषींची सुटका करण्याची शिफारस पाठवली होती. त्यावेळी राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं. त्यांनीही याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही. परंतु भाजप सरकाने नियुक्त केलेल्या राज्यपालांनी हा निर्णय घेतल्यामुळे एका मारेकराची सुटका झाली आहे. तसंच राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याची सुटका व्हायला मोदी सरकार जबाबदार असल्याचं रणदीप सुरजेवाला म्हणाले.

दरम्यान, सुरजेवाला यांनी अनेक प्रश्नही उपस्थित केले. तसंच राजीव गांधी हे फक्त काँग्रेस चे नेते नव्हते तर ते भारताचे पंतप्रधान होते. त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आहे. या सरकारची भूमिका ही निषेधार्ह असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. जर राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याला असं सोडलं जात असेल तर आपल्या देशात जन्मठेपेची शिक्षा दिलेले लाखो कैदी आहेत त्यांची ही सुटका करावी. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आम्हला दुःख झालं आहे. असं सुरजेवाला म्हणाले. तसंच जर अशा प्रकारे पंतप्रधानांच्या हत्येतील दोषींना सोडणार असाल तर कायद्याचं काय असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.

Nilam: