नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर

नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नांदेडमधील पोटनिवडणुकीची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तसेच २० नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये विधानसभेबरोबर लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर
काँग्रेसने अधिकृतपणे परिपत्रक जारी करत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. काही महिन्यांपूर्वी वसंत चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे येथील जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. रविंद्र चव्हाण हे नांदडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या सहीने उमेदवारीचे पत्र जारी करण्यात आले आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारत विजय खेचून आणणारे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला होता. आता या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे आता भाजप या ठिकाणी कोणाला संधी देते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Rashtra Sanchar: