मुंबई : (Congress Leader meet Eknath Shinde) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यांच्या भेटीनंतर काँग्रेस पक्षाचे तीन बडे नेतेही ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, संबंधित काँग्रेस नेत्यामध्ये माजी मंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि अमिन पटेल आदि नेत्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या नेत्यांमधील कारण गुलदस्त्यात आहे. दरम्यान, राज ठाकरे ‘वर्षा’ बंगल्यावरून बाहेर पडत असताना, काँग्रेसचे तीन बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यामुळे ‘वर्षा’ बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
आवघ्या काही तासापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरेंचं स्वागत केलं. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंतही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. संबंधित नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशीलही अद्याप समोर आला नाही.