मुंबई : (Congress Leader On Uddhav Thackeray) बंडखोर एकनाथ शिंदेंनी 40 शिवसेना आमदार घेऊन सेनेविरुद्ध बंड पुकारलं. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेतृत्त्व करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर ठाकरेंनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडताना आपण मुख्यमंत्री पदाचा आणि विधान परिषद सदस्यात्वाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं.
त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि विधान परिषद सदस्यत्त्वाचा राजीमाना देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे जपळपास दिड महिण्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय बदलला आहे. ठाकरे यांनी बदलेल्या निर्णयामुळे ते पुन्हा प्रत्यक्ष राजकारणाच्या आखाड्यात उतरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकानंतर स्थापन झालेल्या ‘मविआ’मुळे उद्धव ठाकरेंच्या गळ्यात अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. आता त्यांनी आपला निर्णय बदलला असून ते विधान परिषदेतून सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.