पंतप्रधानांच्या हेलीकॉप्टर समोर कॉंग्रेस नेत्यांनी उडवले काळे फुगे; मोठी दुर्घटना टळली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर असताना एक धक्कादायक प्रकार घडला. नरेंद्र मोदी यांच्या हेलीकॉप्टर समोर काही कॉंग्रेस नेत्यांकडून दौऱ्याच्या निषेधार्थ काळे फुगे सोडले. फुगे त्यांच्या हेलीकॉप्टर जवळ पोहोचले होते त्यामुळं पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

फुगे सोडणाऱ्या चार कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान आज (सोमवारी) आंध्र प्रदेशातील भीमावर येथे स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याकरिता जात होते. ते विजयवाडा येथून उड्डाण घेताना कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी समोरून निषेधार्थ काळे फुगे हवेत सोडले.

पोलिसांनी फुगे सोडणाऱ्याना जरी ताब्यात घेतले असेल तरी पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काहीच दिवसांपूर्वी पंजाब मध्ये देखील पंतप्रधानांचा ताफा काही आंदोलकांकडून अडवण्यात आला होता.

Sumitra nalawade: