“हिटलर की मौत मरेगा मोदी”

नवी दिल्ली- Mission Agneepath | १४ जूनला मोदी सरकारकडून सशस्त्र दलातील भरती प्रक्रियासंदर्भात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ‘मिशन अग्निपथ’ नावाची योजना भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आली. मात्र योजनेच्या निर्णयानंतर दुसर्याच दिवशीपासून देशभरातून या योजनेचा मोठ्या प्रमाणात विरोध सुरु झाला. देशातील अनेक ठिकाणी संतप्त तरुणांनी जाळपोळ आणि आंदोलने सुरु केली. विरोधी पक्षांकडून देखील मोठ्या प्रमाणात या योजनेचा विरोध केला जात आहे.

दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात मोदी सरकारवर टीकेचा पाढा सुरु ठेवला आहे. मोदी सरकारची अग्निपथ योजना ही देशात नाझीवादाची सुरुवात असल्याचंही कॉंग्रेसकडून म्हटलं जात आहे. त्यातच आता कॉंग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवरील सत्याग्रह मंचावरून सहाय यांनी नरेंद्र मोदी यांची हिटलरशी तुलना केली आहे. त्यावेळी कॉंग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. ते म्हणाले की, “नरेंद्र मोदी हिटलरच्या मार्गावर चालत आहेत. त्यांनी हिटलरचा सगळा इतिहास ओलांडला आहे. हिटलरनेही आपली फौज तयार केली होती. मोदी सरकारही अग्निपथच्या माध्यमातून फौज तयार करत आहे. त्यांचा मृत्यूही हिटलरसारखाच होईल” असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Dnyaneshwar: