“मोदी हे ओबीसीचे नाहीत, आम्ही पूर्ण…”; नाना पटोलेंचा खुलासा

मुंबई : “मी विधानसभा अध्यक्ष असताना आम्ही जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव विधानसभेत पारित केला होता. मात्र, कोरोनामुळे ते होऊ शकले नाही. ते सत्ताधाऱ्यांना पुढच्या काळात जेव्हा जेव्हा जनगणना होईल तेव्हा जातीनिहाय करावी” अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशीच त्यांच्या जातीवरून देखील नाना पटोले यांनी घणाघात केला आहे.

“नरेंद्र मोदी यांचं सरकार आलेलं आहे. आणि ते ओबीसी समाजाचे असल्याचं भाजपकडून सांगितलं जातं. मात्र, गुजरातमधून त्यांचा सगळा डेटा आम्ही गोळा केलेला आहे. मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत. ते जे मोठमोठे बिझनेसवाले लोक असतात अशा अप्पर कास्ट मधले ते आहेत. बीजेपीवाले मतं मिळवण्यासाठी मोदींना ओबीसी म्हणवून घेतात. पुढील काळात आम्ही हे जनतेसमोर आणणारच आहोत.” असा खुलासा नाना पाटोले यांनी केला आहे.

ओबीसीचा फुटबॉल करू नका

“जातीनिहाय जनगणना करण्याची घटनेनुसार केंद्र सरकारलाच परवानगी आहे. विनाकारण राज्य सरकारवर ढकलू नये. अशाप्रकारे ओबीसी समाजाचा जो फुटबॉल केला जातोय तो आता केंद्राने करू नये. आणि जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी आम्ही राज्य ओबीसी, तसेच केंद्रीय ओबीसी कॉंग्रेसच्या वतीने करत आहोत.” अशाप्रकारची रोखठोक भूमिका घेत नाना पाटोले यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.

Dnyaneshwar: