नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना १२ जूनला दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लक्षण आढळून असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. परंतु आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
राहुल गांधी सोबत ईडीने सोनिया गांधी यांना देखील नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्र प्रकरणामुळे ईडी कार्यालयात हजर राहण्याचं नोटीस बजावलं होत. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे त्यांना हजर राहता आलं नाही यामुळे त्यांना नवीन तारीख देण्यात आली होती. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी हे चौकशी आज ईडीसमोर हजर झाले आहेत.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी त्यांना डॉक्टरांकडून घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु नॅशनल हेराल्ड प्रकरणात 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीने समन्स जारी केले असून आता चौकशीसाठी त्या ईडीसमोर हजर होतील का याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.