कर्नाटकमध्ये काँग्रेसची बाजी; 117 जागांवर काँग्रेसची आघाडी, भाजपला मोठा धक्का

Karnataka Assembly Election Result 2023 | सध्या कर्नाटक विधानसभेचे कल (Karnataka Assembly Election Result) समोर येत आहेत. या कलांमध्ये काँग्रेसनं (Congress) बाजी मारल्याचं दिसत आहे. काँग्रेसनं बहुमताचा आकडा पार करत 117 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेस 117 जागांवर आघाडीवर असून भाजप 76 जागांवर आघाडीवर आहे. तर काही ठिकाणी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये चांगलीच चढाओढ सुरू आहे. तसंच बेळगावमध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सध्या सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसनं बेळगावमधील 18 जागांपैकी 14 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आता काँग्रेस आघाडीवर असून भाजप पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.

Sumitra nalawade: