“भगवान राम सितेसोबत बसून दारू प्यायचे…” कन्नड लेखकाचे श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य

Controversial Statement : 20 जानेवारी 2023 रोजी कर्नाटकातील मंड्या येथे एका कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध कन्नड लेखक आणि तर्कवादी के.एस. भगवान यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले, “वाल्मिकी रामायणनुसार, भगवान राम दररोज दुपारी पत्नी सीतेसोबत बसून दारू प्यायचे. राम सीतेला जंगलात पाठवायचा, पत्नीची कधीच काळजी घेतली नाही”, असे वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे.

यावेळी ते असंही म्हणाले की, “सध्या रामराज्य बनवण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण, वाल्मिकी रामायणातील उत्तरकांड वाचून लक्षात येईल की, राम आदर्श नव्हते. त्यांनी 11,000 वर्षे नाही तर केवळ 11 वर्षे राज्य केलंय. राम दररोज दुपारी सीतेसोबत बसायचे दारू प्यायचे. ते पत्नी सीतेला जंगलात पाठवायचे आणि कधीच तिची काळजी घेतली नाही. रामाने झाडाखाली बसून तपश्चर्या करणाऱ्या शूद्र शंबुकाचा शीरच्छेद केला. राम कसा कुणाचा आदर्श असू शकतो ?” असे ते म्हणाले.

यापूर्वी 2019 मध्येही के.एस. भगवान यांनी श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळीही त्यांनी “प्रभू राम नियमितपणे दारू पितात आणि त्यांनी सीतेलाही दारू पाजली होती असा दावा केला होता.” त्यांनी त्यांच्या ‘राम मंदिर याके वेद’ या पुस्तकातही याबद्दल लिहिले आहे. त्यांनी त्या पुस्तकात रामायणाविषयी असे काही शब्द लिहिले होते, जे वादग्रस्त ठरले आहेत. याशिवाय, 2015 मध्ये के.एस. भगवान यांनी हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीतेची काही पाने जाळणार असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Dnyaneshwar: