आधी नडले मग भिडले; आमदार अन् खासदारामध्ये भररस्त्यात फिल्मी स्टाईल राडा, व्हिडीओ व्हायरल

Jharkhand News | सत्ताधारी आणि विरोधक नेहमी एकमेकांवर टीका करताना दिसतात. काहीवेळा तर अनेक मंत्र्यांची बोलताना जीभ देखील घसरते. त्यानंतर वादाला तोंड फुटतं आणि नेते एकमेकांवर टीका करतात. तर आता झारखंडमधील (Jharkhand) साहिबगंजमध्ये एकाच पक्षातील आमदार आणि खासदार एकमेकांशी भिडले आहेत. त्या दोघांमध्ये एवढा मोठा वाद झाला की त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

झारखंडमध्ये तीनपहारच्या बाकुंडी येथे रस्त्याच्या पायाभरणीचे काम सुरू होते. त्यावेळी खासदार विजय हासदा (Vijay Hansda) आणि JMM चे आमदार लोबिना हेम्ब्रम (Lobin Hembrom) उपस्थित होते. हे दोघंही समोर आल्यानंतर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. ही बाचाबाची एवढी वाढली की खासदार विजय हासदा आणि आमदार लोबिना हेम्ब्राम एकमेकांना भिडले. सध्या या दोघांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

नेमकं घडलं तरी काय?

रस्त्याच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला आमदार लोबिन हेम्ब्राम यांना आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. तर खासदार विजय हासदा यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. पण, आमंत्रण नसतानाही लोबिन हेम्ब्राम तेथे आले होते. त्यावेळी विजय हासदा यांनी उद्घाटनाला सुरूवात केली होती. हे पाहून लोबिन यांना राग आला आणि त्यांनी विजय यांच्यावर राग व्यक्त केला. त्यानंतर दोन्ही नेते एकमेकांना भिडले आणि त्यांच्यात राडा झाला.

Sumitra nalawade: