कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण; आर्यन खानला NCB कडून क्लीन चिट

मुंबई : NCB On Aryan Khan |ऑक्टोबर महिन्यात मुंबईतल्या कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या पार्टीमध्ये ड्रगचं सेवन आणि खरेदी विक्री केल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा(Son of actor Shahrukh Khan) आर्यन खानला (Aryan Khan)अटक करण्यात आली होती. यांच्यासोबत वीस जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court)या प्रकरणी खटला सुरू होता. मात्र आज कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात आर्यन खानला क्लिनचिट देण्यात आली आहे.

ड्रगच्या सेवन आणि खरेदी प्रकरणी आर्यन खान(Aryan Khan) याला अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर काही आठवड्यांनी अखेर आर्यन खानची जामिनावर मुक्तता झाली होती. परंतु आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने(NCB) कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खानचं नाव घेतलेलं नाही. तसंच त्याच्याकडे कोणतेच अमली पदार्थ आढळले नसल्याने एनसीबीकडूनच त्याला क्लिनचिट देण्यात आली आहे.

त्याबरोबर आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. जेव्हा या प्रकरणी तपास एसआयटी(SIT) कमिटीकडे देण्यात आला. त्यावेळी आर्यन खान आणि त्याच्यासोबतच्या सहा जणाकडे कसलेच अमली पदार्थ आढळले नाहीत यामुळे त्यांच्यावर कोणतीच तक्रर करण्यात येणार नसल्याचं एनसीबीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच जरी त्यांच्याकडे कोणतेही पदार्थ सापडले नसले तरीही त्यांच्या मित्रांकडे मात्र हे पदार्थ सापडले होते, त्यामुळे या लोकांना अटक करण्यात आली होती. असा खुलासाही एनसीबीकडून करण्यात आला आहे. तर राहिलेल्या १४ जणांवर मात्र आज पहिलं आरोपपत्र दाखल कऱण्यात आलं आहे.

Nilam: