मुंबई : दोन वर्षापासुन राज्यावर आर्थिक संकट आसताना, कोरोनाकाळात सरकारमधील १८ मंत्र्यांचा सरकारच्या तिजोरीतून बिलं भरल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्वाधिक मंत्र्यांचा समावेश आहे. या सर्व मंञ्याचा एकूण आकडा कोटींच्या घरात आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या आर्थिक संकाटात मंञ्यांवर सरकारने ही कोट्यावधींची उधळपट्टी केली आहे. अशी माहिती काही टिव्ही माध्यमांनी समोर आणली आहे. कोरोना काळात जनता सरकारी रुग्णालयात बेड, ऑक्सीजन आणि औषधांसाठी धडपडत असताना, महाविकास आघाडी सरकारमधील काही मंञी माञ, मुंबईतील महागड्या खासगी रूग्णालयात उपचार घेत होते. विशेष बाब म्हणजे, या यादीत राज्याचे आरोग्यमंञी राजेश टोपे यांचे नाव असून सर्वात जास्त ३४ लाखांचा खर्च त्यांच्यावर करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या लाखो रुपयांच्या खर्चाची बिलं सरकारी तिजोरीतून भरण्यात आली आहेत. गेल्या दोन मंत्र्यांनी हे उपचार घेतले आहेत. या सर्व मंत्र्यांचा एकूण खर्च हा १ कोटी ३९ लाख रुपये इतका झाला आहे. या उपचार घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक ९, काँग्रेसचे ६ तर शिवसेनेच्या ३ मंत्र्यांचा समावेश आहे. राजेश टोपे (राष्ट्रवादी) – ३४ लाख, नितीन राऊत (काँग्रेस) – १८ लाख, हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) – १४ लाख, अब्दुल सत्तार (शिवसेना) – १२ लाख, जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) – १२ लाख, छगन भुजबळ (राष्ट्रवादी) – ९ लाख, सुनील केदार (काँग्रेस) – ९ लाख, जयंत पाटील (राष्ट्रवादी) – ७ लाख, सुभाष देसाई (शिवसेना) – ७ लाख, अनिल परब (शिवसेना) – ७ लाख या मंञ्यांचा समावेश आहे. मुंबईतील सर्वात महागड्या रुग्णालयात हे उपचार करण्यात आले आहेत.