मुंबई : (Cotton will get good price in Maharashtra) गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला असलेली मागणी, कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि निसर्गाची साथ यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाला आणि मेहनतीला यंदातरी फळ मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, कापूस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नगदी पिकांपैकी एक प्रमुख पीक आहे. मागील वर्षीच्या हंगामाच्या शेवटी देखील कापूसाला चांगला भाव मिळाला होता. प्रती क्विंटल 14 हजार रुपये प्रमाणे त्यामुळे यावर्षी देखील कापसाला चांगला भाव मिळणार असल्याचे आंदाज वर्तवण्यात येत आहेत. हरियाणामध्ये सध्या नवीन कापसाचे बाजार चालू झाले असून तिथं 10 हजार प्रती क्विंटल बाजारभाव आहे. त्यामुळे कापसाचं पीक राज्यातील शेतकऱ्यांना हा नवा अशेचा किरण घेऊन आला आहे.
शेतकरी ऊन, वारा, पाऊस या सर्वांपासून बचाव करुन शेतीची निगराणी करत असतो. मात्र, त्याच्या नशिबी सदैव निराशाच असते. आपण ‘बळीराजा’च राज्य येऊ दे म्हणून देवाला साकडं घालतं असतो. मात्र, ते प्रत्यक्षात होताना दिसत नाही. या देशात कोणीतरी या जगाच्या पोशिंद्याचा कैवारी आहे की नाही असा प्रश्न पडायला लागतो. प्रत्येक सत्ताधारी शेतकऱ्यांच्या नावावर स्वःताची पोळी भाजून घेताना दिसतात. सरकारी धोरणं, योग्य बाजारभाव अन् बाजारातील विक्री-लिलाव पद्धतीत पारदर्शकता आणली तर हे पांढरं सोनं पुन्हा चकाकू लागेल. शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं हिच अपेक्षा आहे.