महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीला न्यायालयाकडून नवी तारीख!

नवी दिल्ली : (Court New Date For Shiv Sena and Shinde Group Case) सध्या राज्याच्या राजकारणात मोठा संघर्ष सुरु आहे. त्यात सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडं संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. बुधवार दि. 03 रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. दरम्यान झालेल्या शिवसेना आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. कपिल सिब्बल यांच्याकडून वारंवार बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला.

तर या मुद्याला खोडत शिंदे गटाने वारंवार आपण अद्यापही पक्षातच आहेत, आणि पक्षाचे सदस्यत्वही सोडलं नसल्याचा दावा केला. या सर्व पार्श्वभुमीवर सुप्रीम कोर्टाने यावेळी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांना लेखी युक्तिवाद नव्याने तयार करण्यास सांगितले. त्याचबरोबर उद्या म्हणजेच गुरुवारी दि. 04 रोजी सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं. उद्या कामकाज सुरु झाल्यानंतर ही सुनावणी पहिल्या क्रमांकावर असेल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

शिंदे सरकारच्या वैधतेला, विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटिशींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज न्यायालयात एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे निर्णयाचे अधिकार देण्याची मागणी केली असता सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या वकींना चांगलेच खडसावलं. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी पार पडली.

Prakash Harale: