सध्या टीम इंडिया १ जुलै पासून एजबॅस्टन येथे सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. मात्र या सामन्यासाठी टीममधील दिग्गज खेळाडू रविचंद्रन आश्विन असणार नाही यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसलेला आहे. अश्विन कोरोना पॉसिटीव्ह आला असल्याने टीम इंडियाच्या खेळीवर याचा थेट परिणाम होणार आहे. अश्विन कोरोना पॉसिटीव्ह असल्याने इंग्लंडच्या दौऱ्यावर जाऊ शकला नाही.
अशातच टीमचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी इंग्लंड दौऱ्यावर पोहोचल्यानंतर काही तासांतच सोशल मिडियावर फोटो व्हायरल केले. त्यामध्ये दोघेही इंग्लंडमध्ये फिरत होते. त्यांनी चाहत्यांसोबत सेल्फी देखील काढल्या. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) विराट आणि रोहित वर संतापले.
इंगलंडमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोन रुग्ण वाढलेले आहेत. अगोदरच संघातील एक खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह आलेला असल्याने BCCI कडून इतर खेळाडूंची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे इंग्लंड मध्ये फिरत असल्याने विराट आणि रोहित यांना बोर्डाकडून वार्निंग देण्यात आली आहे.