दिल्लीत एकाच दिवशी १४ कोरोना पॉसिटीव्ह मुले; डॉक्टरांकडून शाळा बंद ठेवण्याचे आवाहन

नवी दिल्ली : १ एप्रिल पासून सर्व निर्बंध हटवल्यानंतर देशभर शाळा ऑफलाईन सुरु करण्यात आल्या आहेत परंतु पंधरा दिवसांचा कालावधी लोटला नाहीतर दिल्ली मध्ये एका खाजगी शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पोसीसीटिव्ह आल्यानंतर एकूण १४ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. यांपैकी अनेकांना इतर आजार देखील असल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर सरकारने मोठी दखल घेत दिल्लीतील शाळांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. ज्यात जर एखादा विद्यार्थी किंवा कर्मचारी चाचणीत कोरोना पॉसिटीव्ह आढळल्यास संपूर्ण कॅम्पस किंवा ती विंग तात्पुरती बंद करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.

बरोबरच मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे कि, विद्यार्थी आणि शिक्षकांनी कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. ज्यात सोशल डिस्टंसिंग, मास्क लावणे आदींचा समावेश असणार आहे. मात्र दिल्लीतील काही डॉक्टर कोरोना रुग्णसंख्येचा वाढता धोका टाळण्यासाठी शाळा बंद करण्याचे आवाहन करत आहेत. गेल्या २४ तासांत दिल्लीत पॉसिटीव्ह दर ३. टक्के असून एकूण ३६६ कोरोनाची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

Dnyaneshwar: