क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात, रूग्णालयात उपचार सुरू

हम्मदपूर | टीम इंडीयाचा (Team India) महत्त्वाचा खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारला भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून घरी जात असताना हम्मदपूर येथे हा अपघात झाला. ऋषभची कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला. मात्र, या अपघातातून ऋषभ थोडक्यात बचावला आहे. त्याला दिल्लीच्या रुग्णालयात तातडीनं दाखल केलं आहे.

ऋषभची कार दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानं त्याच्या कारला आग लागली. मात्र, या अपघातातून ऋषभ थोडक्यात बचावला. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला दिल्लीच्या रुग्णालयात दाखल केलं. तसंच ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहेत. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. गाडी चालवताना झोप आल्यानं हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. ऋषभ पंत गाडीत एकटाच होता. अपघात झाल्यानंतर गाडीला आग लागली. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ऋषभची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Sumitra nalawade: