पुणे | पुण्यातील (Pune) मुंढवा भागातील एका रहिवाशाला बिल्डरकडूनच मारहाण झाली आहे. या रहिवाशाने सोसायटीचा मेंटेनन्स थकवल्याने वाद होऊन त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. या रहिवाशाने सोसायटीचे मेंन्टनन्स भरले नव्हते. या मुळे रहिवाशाला शिवागाळ करण्यात आली. बिल्डरने लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामध्ये रहिवाशाचा हात फॅक्चर झाला असल्याची तक्रार मुंढवा पोलीस (Mudhava Police)ठाण्यात नोंद झाली आहे. दिपक फडतरे असं तक्रार दाखल केलेल्या रहिवाशाचं नाव असून पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
सोसायटीमधील रहिवाशी दिपक फडतरे यांच्याकडून महिन्याचा मेंन्टनन्स थकल्यामुळे बिल्डर तुषार शहाने तीन व्यक्तींना घेऊन रहिवाशाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक तुषार शहा (रा. खराडी) यांच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहिवाशी दीपक फडतरे यांनी या संदर्भात मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फडतरे यांनी सोसायटीचा मेंटनन्स भरला नव्हता. या कारणावरून शहा यांनी फडतरे यांना सुरुवातीला शिवीगाळ केली. त्यानंतर वाद वाढत गेला. मग बांधकाम व्यावसायिक तुषार शहा यांच्यासह त्यांच्याबरोबर असलेल्या आणखी दोघांनी फडतरे यांना लोखंडी गजाने मारहाण केली. रहिवाशी दीपक फडतरे यांना लोखंडी गजाचा फटका बसल्याने फडतरे यांचा हात फ्रॅक्चर झाला. फडतसे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.