गरोदर प्रेयसीवर चाकूने वार; दिवसभर गाडीत फिरवले आणि मग…

Blue Guest Featured Live Event Twitter Post 74Blue Guest Featured Live Event Twitter Post 74

पुणे | शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक शहर, स्मार्ट सीटी आणि आता कॉस्मोपॉलीटियन सीटी या नावानं ओळखलं जाणारं पुणे मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकल्याचं पाहायला मिळालं. अशातच मुळशीच्या दारवली येथील सिंबायोसिस कॉलेज परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात गरोदर प्रेयसीवर वार करत प्रियकराने तिला गंभीर जखमी केलं. सुदैवाने यात 25 वर्षीय गरोदर तरुणी जीव वाचवून पळण्यात यशस्वी झाली. तरुणी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली होती. तिचा जीव वाचला असला तरी पोटातील बाळाचा मात्र मृत्यू झाला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

विनायक सूर्यवंशी नावाचा तरुण आणि पीडित तरुणी पुण्यात एकत्र कामाला होते. इथेच त्यांची ओळख झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. पुढे कामानिमित्त ही तरुणी मुंबईला गेली. विनायक शनिवारी म्हणजेच 13 एप्रिल रोजी तिला घेऊन पुण्याला निघाला. रविवारी पहाटे लोणावळ्यात त्याने प्रेयसीवर चाकूने वार केले. त्याची प्रेयसी गरोदर होती. वार केल्यानंतर तो जखमी अवस्थेतच तिला दिवसभर गाडीत फिरवत राहिला.

रविवारी रात्री त्याने पौडजवळील सिंबायोसिस कॉलेजजवळ गाडी उभा केली. संधी मिळताच तरुणीने गाडीतून उतरून पळ काढला. तरुणीने पळ काढताच प्रियकरही तिथून फरार झाला. जखमी तरुणीला पौडचे पोलीस हवालदार संतोष दावलकर आणि दीपक पालके यांनी ससून रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणात तरुणीचा जीव वाचला. मात्र, पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे . पोलिसांनी याप्रकरणी थेरगाव येथील संशयित आरोपी विनायक सूर्यवंशी याला ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Rashtra Sanchar Digital:
whatsapp
line