स्वसंरक्षणासाठी पेपर स्प्रे

समाजात महिलांना नेहमी कुठल्याही परिस्थितीसाठी तयार रहावे लागते. जगाने त्यावर पेपर स्प्रे सारखे उपाय शोधले. मात्र पेपर स्प्रे बनवताना आणि वापरताना काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. काही सार्वजनिक ठिकाणी त्यावर बंदी देखील आहे का, हे चेक करावे लागते.

जगात महिलांसाठी स्वसंरक्षणाची गरज कायमच आहे. पेपर स्प्रे बाळगण्याची मुभा आहे ना, हे काही ठिकाणी चेक करावे लागते.

भारतात कामकाज करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार महिला, शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रात अशा विविध प्रकारे महिला कार्यरत असतात. बऱ्याचदा नोकरदार महिलांना कामाच्या निमित्ताने वेळी अवेळी बाहेर जावे लागते. अशावेळी महिलांना विशिष्ट समस्यांना तोंड द्यावे लागते. अनोळखी ठिकाणी छेडछाड, मंगळसूत्र हिसकावणे, विनयभंग किंवा अतिप्रसंगाचे प्रकार घडतात. एखादा प्रसंग आलाच, तर महिला, मुलींना स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे. मदत मिळण्याच्या शक्यता कमी असतात. मग अशावेळी प्रत्येक महिलेकडे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पेपर स्प्रे असणे गरजेचे आहे. मात्र, काही सार्वजनिक ठिकाणी तो बाळगणे किंवा वापरणे यावर बंदी आहे का, हे चेक करावे लागते.

पेपर स्प्रे काय असतो?
पेपर स्प्रे म्हणजे मिरचीपासून बनलेला एक द्रावण स्प्रे. याचा वापर सहसा महिलांच्या संरक्षणासाठी केला जातो. पेपर स्प्रे हा छोट्या कॅनमध्ये बाजारात सहज उपलब्ध असतो. तो हवेत फवारल्यास डोळे जळू लागतात, डोळे उघडे ठेवणे कठीण होते, श्वास घेणे कठीण जाते आणि खोकलाही येतो. जर ते एखाद्याच्या चेहऱ्यासमोर किंवा डोळ्यांसमोर फवारले गेले तर ती व्यक्ती जळजळ आणि वेदनांमुळे त्रस्त होते.

पेपर स्प्रे कसे कार्य करतो?
या स्प्रेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कॅप्सेसिन आहे. हा पदार्थ शिमला मिरचीमध्ये आढळतो. हा स्प्रे रसायने दळून आणि मिसळून तयार केला जातो. म्हणूनच त्याला पेपर स्प्रे म्हणतात. मिरची ठेचल्यानंतर जे तेल निघते त्याला ओलिओरेसिन कॅप्सिकम म्हणतात. आपण मिरचीला हात लावून डोळ्यांना हात लावला, तर किती वाईट स्थिती होते. तर हे कॅप्सेसिनमुळे होते. आता विचार करा, जी गोष्ट डोळ्यांची इतकी वाईट अवस्था करते ती हवेत पसरली तर काय होईल. पेपर स्प्रे बनवताना आणि वापरताना काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

पेपर स्प्रे कुठे वापरला जातो?
गर्दी नियंत्रित करण्यासाठी जगात अनेक ठिकाणी पोलीस यंत्रणा पेपर स्प्रेचा वापर करतात. अनेक वेळा परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आंदोलन करणाऱ्यांवरही याचा वापर केला जातो.
स्वसंरक्षणासाठीही याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेकदा अतिप्रसंग ओढवला किंवा रस्त्याने चालताना मागून कुणी हल्ला केला, तर त्यांच्यावर फवारणी करून त्याला अस्वस्थ केले जाऊ शकते. तो वेळ आपल्याला पळ काढण्यासाठी मिळतो.

परवानगीचा मुद्दा काय?
पेपर स्प्रे ऑनलाइन किंवा स्टोअरमध्ये खरेदी करू शकतो. त्यासाठी कोणताही नियम किंवा अट नाही. परंतु काही मेट्रो किंवा विमानसेवांसारख्या ठिकाणी पेपर स्प्रे कॅरी-ऑन बॅगमध्ये नेण्यास बंदी असू शकते.
काही सार्वजनिक ठिकाणी त्यावर बंदी देखील आहे का, हे चेक करावे लागते.

चुकून स्प्रे झाला तर काय?
पेपर स्प्रेची फवारणी झाल्यावर जर तुम्ही फक्त चेहरा किंवा प्रभावित भाग पाण्याने धुतला तर त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. तुमच्या त्वचेवर पेपर स्प्रेची फवारणी झालेल्या कोणत्याही ठिकाणी स्पर्श करू नका, अन्यथा ते पसरेल आणि स्प्रे लागू न झालेल्या इतर ठिकाणी जळजळ होण्यास सुरुवात होईल. बाधित क्षेत्र साबण, बेबी शांपू किंवा हँडवॉशने स्वच्छ धुवा. जर स्प्रे डोळ्यात गेला असेल, तर वारंवार डोळे मिचकावा, डोळ्यातील अश्रुंसोबत स्प्रे बाहेर येण्याची शक्यता जास्त असते.

Prakash Harale: