पुणे | सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात (Pune Crime News) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण अधिक वाढले आहे. पुण्यातील कोथरूड मधून एक खळबळजनक बातमी समोर आलीये. लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार करण्याची घटना समोर आली आहे. तसेच, तिच्याकडून पाच लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणात आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. तसेच, वैद्यकीय उपचाराच्या बहाण्याने पाच लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, अलंकार पोलिसांनी तपन अनंत थत्ते (वय. 37, रा. कोथरुड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोथरुड येथील 36 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर आपल्या आईच्या वैद्यकीय उपचाराचे कारण सांगून त्याने तरुणीकडून वेळोवेळी पैसे उकळले. मात्र ते पाच लाख रुपये आरोपीने तरुणीला परत केलेच नाही. यावरून आपली फसवणूक होत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तरुणीने त्याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली असता संतापलेल्या आरोपीने तिला धमकावले. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.