स्वराज्य संघटना झी विरोधात आक्रमक; पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शिविगाळ, लाठीचार्ज करत अटक, आंदोलन चिघळण्याची शक्यता

मुंबई : (Swarajya Sanghatana, Sambhajiraje Chhatrapati) हर हर महादेव चित्रपट (Har har Mahadev) झी मराठी (Zee Marathi) वर प्रदर्शित करण्याविरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली असून आज मुंबई मधील (Zee Marathi Office Mumbai) कार्यालयाच्या समोर, झी च्या पत्रिकांची होळी करण्यात आली. स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतरही झी ने सिनेमा प्रदर्शित करण्याच्या हट्टामुळे स्वराज्य च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोडफोडीचा प्रयत्न केला परंतु पोलिस बंदोबस्तामुळे होळी करण्यात आली.

झी मराठी ला २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून झी ने माघार घेतली नाही तर राज्यभरात झी ची वाहिने, कार्यालयांवर लक्ष करण्यात येईल व झी Boycott मोहीम घेवून झी विरोधात जनजागृती करण्यात येईल. हर हर महादेव सिनेमामध्ये इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास मांडण्यात आला असून त्यामुळे धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या इतिहासाला डाग लागत असल्यामुळे स्वराज्य ने सुरुवातीपासूनच सिनेमाला विरोध केला आहे.

महाराष्ट्रभरातून जमलेल्या कार्यकर्त्यांनी झी च्या कार्यालया समोर चांगलाच गोंधळ घातल्याचे पहायला मिळाले.यावेळी स्वराज्य चे पदाधिकारी करण गायकर, धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर, आप्पासाहेब कुडेकर, मंगेश कदम ,गणेश कदम, केशव गोसावी, तिरुपती भगणुरे , सदानंद पुयड , राहुल गावडे , अशिष हिरे , रुपेश नाठे ,विनोद परांडे , द्वारकेश जाधव , नवनाथ शिंदे , दिनेश नरवडे , वैभव दळवी, राहुल लांडगे, विजय वाहुळे , प्रथमेश पुडे , महेश पुंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Dnyaneshwar: