“औरंगजेबाजी कबर केंद्राच्या अखत्यारीत येते; मग बेकायदेशीर असेल तर…” राऊतांचं विरोधकांना प्रतिऊत्तर

मुंबई : काहीच दिवसांपूर्वी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद दौऱ्यादरम्यान ओरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवल्यामुळे त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात चांगलाच वादविवाद सुरु आहे. या घटनेनंतर एकीकडे ओवेसींवर टीका होत असताना दुसरीकडे राज्य सरकारवर देखील भाजपाकडून टीका केली जात आहे.

‘राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा पठण केल्याने त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मग ओवेसींवर करणार का’ असा सवाल भाजपकडून राज्यातील सत्ताधारी पक्षाला केला जात आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला चांगलीच विचारणा केली आहे.

ते म्हणाले, “तुम्हाला ती कबर आत्ताच दिसतीये का? तुमचं राज्य होतं ना ५ वर्ष? तेव्हाच टाकायची ना उखडून. तुम्हाला ते बेकायदेशीर वाटतंय, तर करा तिथे काय करायचं ते. आताही ते करू शकतात. केंद्र सरकारच्या अखत्यारीतली वास्तू आहे ती”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Dnyaneshwar: