मनुष्यहानी वित्तहानी। वैभवहानी महत्त्वहानी। पशुहानी पदार्थहानी। या नांव आधिभौतिक॥
आधिभौतिक तापात मनुष्य-द्रव्य, वैभव, मोठेपणा, जनावरे आणि चीजवस्तू यांची फार मोठी हानी होते. चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापूर, उष्माघात, पाऊस यांसारखी भौतिक संकटे, अण्वस्त्रासारखी भयानक शस्त्रास्त्रे यांपासून अतोनात हानी होते. देशच्या देश बेचिराख होतात. समर्थांच्या काळातील त्यांनी वर्णन केलेल्या काही शिक्षेच्या पद्धती चित्तथरारक आहेत, उदाहरणार्थ ः ज्याला शिक्षा करावयाची त्याला विजार नेसवून त्या विजारीत सरडा सोडून विजार सर्व बाजूंनी बंद करीत. त्याला सरडा भरणे म्हणतात. क्षुब्ध मांजर आणि अपराधी माणूस यांना एका खोलीत कोंडून ठेवून त्या मांजराकडून माणसाला मारावीत. अपराध्याचे नाक, कान, हात, पाय, जीभ, ओठ कापून टाकीत. डोळे आणि वृषण काढीत. सर्व नखांत सुया रोवीत. कडेलोट करीत. तोफेच्या तोंडी देत. कानात खुंट्या आणि गुदद्वारात मेखा मारीत. अंगाचे कातडे सोलून काढीत. शिरा काढून घेत. मशाली व काकडे लावून भाजीत असत. या सगळ्या आधिभौतिक विपत्ती. आधुनिक स्मगलरांकडून केल्या जाणार्या जाचालाही लाजवील, असा हा छळ होता. लहानपणी आई, तारुण्यात बायको आणि म्हातारपणी मुलगा मरणे हे आधिभौतिक दु:ख. असे हे आधिभौतिक दु:खांचे डोंगर वर्णनातीत आहेत.
नसर्गरूपी एकाच नाण्याच्या ‘उपयोग’
आणि ’संहार’ या दोन बाजू आहेत.
सी. ग. देसाई