यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा? दोन्ही गटाकडून देण्यात आले अर्ज

मुंबई | गेल्या वर्षीचा अनुभव पाहता ठाकरे गटाने यंदा सावध भूमिका घेत दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावे म्हणून महिनाभरापूर्वीच मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. त्यासोबत शिंदे गटानेही आपला अर्ज महापालिकेकडे दिला आहे. आपला दसरा मेळावा (Dasara Melava) हा शिवाजी पार्कवरच (Shivaji Park) व्हावा यासाठी दोन्ही गटाकडून महापालिकेला पत्रक देण्यात आले आहेत. पण परंपरेप्रमाणे यंदाही शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार आणि त्यासाठी प्लॅनही तयार असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येतंय.

दादर येथे छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर स्थापनेपासून शिवसेना दसरा मेळावा घेत आली आहे. शिवसेनेत दोन गट पडलेले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून हे मैदान मिळावे यासाठी एक महिन्यांपूर्वी अर्ज करण्यात आलाय. त्यामुळे कोणाला परवानगी द्यावी याबाबत महापालिकेसमोर पेच निर्माण झाला आहे. अद्याप महानगरपालिकेने कोणालाही परवानगी दिली नाही.

मागील वर्षी वाद झाला होता होता. परंतु त्यावेळी शिवसेना कोणाची याबाबत निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे. त्यामुळे नेमका काय निर्णय प्रशासन घेत हे पाहावं लागेल.

Dnyaneshwar: